Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू ! उद्योजक केतन वोरा यांच्या प्रयत्नांना यश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 April 2024
in Social
0
रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू ! उद्योजक केतन वोरा यांच्या प्रयत्नांना यश
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू ! उद्योजक केतन वोरा यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर : बालाजी अमाईन्सच्या वतीने एक कोटी 27 लाख रुपये सीएसआर निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत बसविलेल्या विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.  अखेर ही विद्युत दाहिनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

सोलापूर महापालिका प्रशासनाच्या
उदासीनतेमुळे विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचा आरोप करत महापालिकेने तत्काळ विद्युत दाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी तसेच दुरुस्ती कामासाठी महापालिकेने यापुढे मक्तेदार नेमावा, अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन वोरा यांनी मागील महिन्यात केली होती. महापालिका प्रशासनाने कार्यवाही करून ही विद्युत दाहिनी पूर्ववत सुरू केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने विद्युत दाहिनी दुरुस्तीसाठी एका मक्तेदारावर जबाबदारी सोपवली आहे. स्थानिक मक्तेदार दत्तात्रय कदम यांना यांच्याकडे हे काम देण्यात आले आहे.
कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक उपायोजना करीत असताना इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्यासाठी बालाजी अमाईन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून सोलापूर महापालिकेच्या रुपाभवानी स्मशानभूमी येथे अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसविणे व आजूबाजुचा परिसर विकसित करण्यासाठी सुमारे 1 कोटी 27 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत
विद्युत दाहिनी, श्रध्दांजली सभागृह / वेटिंग हॉल (१४मी. x १२मी.), पुरुष व महिला यांच्यासाठी २ स्वतंत्र स्वच्छता गृह युनिट व हातपाय धुण्याकरिता स्वतंत्र हँडवॉश सेंटर,
विद्युत दाहिनी परिसरास पूर्ण बंदीस्त करण्यासाठी  चेनलिंक फेन्सिग व गेट, विद्युत दाहिनी परिसरात छोटे उद्यान, वृक्षारोपण,
अंत्यविधीस उपस्थित नागरिकांना बसण्याकरिता मार्बलचे १७ बाकडे, पूर्ण परिसरास रंगरंगोटी व लाईट फिटींग्ज गुणवत्तापूर्ण, नेटक्या पद्धतीने पूर्ण करून देण्यात आली. बालाजी अमाईन्स कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) हे मोठे काम शहरवासीयांच्या मदतीसाठी महापालिकेस मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान, बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने येथील विद्युत दाहिनी व सर्व परिसराचे दि. 26 जानेवारी 2022 रोजी लोकार्पण करण्यात आले. महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने विद्युत दाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता दोन वर्षासाठी मनीष इटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आला. तसा दोन वर्षाचा करारही करण्यात आला. दरम्यानच्या काळात या देखभाल दुरुस्ती मक्ता कराराची दोन वर्षाची मुदत दि. 5 जानेवारी 2024 रोजी संपली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने येथील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे मात्र मागील महिन्यात येथील विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती.

विद्युतदाहिनी पूर्ववत सुरू
केली : संदिप कारंजे

रूपा भवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर विद्युत दाहिनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठी एका मक्तेदारावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे यापुढे कोणतीही गैरसोय होणार नाही, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.

उद्योजक केतन वोरा यांनी मानले महापालिकेचे आभार

रूपा भवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद पडली होती. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने विद्युत दाहिनी मक्तेदार नेमून दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी केली होती. या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. अखेर महापालिका प्रशासनाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि ही विद्युत दाहिनी सुरू झाली आहे. मक्तेदारही नेमला आहे. कार्यवाही झाल्याने समाधान वाटले. नागरिकांची गैरसोय टळली, असे सांगत उद्योजक केतन वोरा यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
———-

Tags: Ketan VoraRupa Bhavani
SendShareTweetSend
Previous Post

मंगळवेढयात पांडुरंगाची ताकद मिळाली भाजपच्या राम सातपुते यांना ; प्रशांत परिचारक यांचे हे आवाहन

Next Post

राहुल गांधी यांची तोफ आज सोलापुरात ; काँग्रेसने केली सभेची जय्यत तयारी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राहुल गांधी यांची तोफ आज सोलापुरात ; काँग्रेसने केली सभेची जय्यत तयारी

राहुल गांधी यांची तोफ आज सोलापुरात ; काँग्रेसने केली सभेची जय्यत तयारी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001805
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group