Tuesday, October 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीस ठरतायत भाजपच्या निवडणूक प्रचारातला हुकमी एक्का !

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये फडणवीसांचा प्रचार भाजपला फायदेशीर ठरला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 December 2023
in political
0
0
SHARES
234
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : उत्तर भारतातल्या तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपने बहारदार विजय मिळवत काँग्रेससह विरोधकांचा धुव्वा उडवला. भाजपच्या प्रचारातल्या अनेक स्टार प्रचारकांनी या प्रचारात मोलाची भूमिका बजावली असून यातल्या एका स्टार प्रचारकाचं महाराष्ट्र कनेक्शन पुढे आलंय. देवेंद्र फडणवीसांनी 4 राज्यांमध्ये मिळून 23 ठिकाणी प्रचार सभा आणि रोड-शो केले होते. यातल्या 14 ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधल्या भाजप विजय साकार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे नेते म्हणून महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे येतंय. फडणवीसांनी विधानसभा निवडणूक रणधुमाळीच्या काळात 4 राज्यांत घेतलेल्या 23 प्रचारसभा आणि रोड-शो घेतले होते. त्यांच्या या सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. तसंच, प्रत्यक्ष प्रचारसभा आणि रोड-शोंव्यतिरक्तही याठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी स्थानिकांच्या थेट भेटी घेऊन चर्चा केल्या होत्या. याचं थेट फळ निवडणूक निकालांमध्ये भाजपला मिळालेलं दिसलं. फडणवीसांनी घेतलेल्या 23 प्रचारसभा आणि रोड-शोंपैकी 14 ठिकाणी भाजपला यश आलंय.

23 ठिकाणी प्रचार आणि 14 ठिकाणी विजय
देवेंद्र फडणवीस यांच्या 4 राज्यात सभा आणि भाजपा विजयी झालेल्या जागांची माहिती पुढे आली आहे. मध्यप्रदेशात एकूण 8 मतदारसंघात त्यांचे झंझावाती दौरे झाले. यात धार, इंदोरचे 3 मतदारसंघ, महू, बुरहाणपूर असे मतदारसंघ 6 भाजपने जिंकले. राजस्थानमध्ये फडणवीसांनी प्रचार केलेल्या एकूण 6 मतदारसंघांपैकी केसरी, नासिराबाद, अजमेर उत्तर, सांगानेर अशा 4 जागा भाजपला मिळाल्या. तर छत्तीसगढमध्ये त्यांनी प्रचार आणि रोडशो 5 मतदारसंघात केले. यापैकी रायपूर दक्षिण, रायपूर उत्तर, रायपूर पश्चिम, रायपूर ग्रामीण इथे भाजप विजय साकार केला. तेलंगणामध्ये मात्र, 4 ठिकाणी प्रचार करूनही एकाही ठिकाणी भाजपला विजय मिळवला नाही. विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीसांचं कार्ड प्रभावीपणे चालत असल्याचं लक्षात आल्याने केंद्रीय भाजपने त्यांना पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

मतदानाचा टक्का वाढला
बिहार, गोवा राज्यांमध्ये प्रचाराची कमाल दाखवलेल्या फडणवीसांनी उत्तर भारतात पुन्हा एकदा आपल्या नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवल्याची चर्चा सध्या पक्षात सुरू आहे. त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचं पुढे येतंय.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांनी झंजावाती दौरे केले होते. 2014 साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांच्याभोवती महाराष्ट्रासह राज्याच्या राजकारणात एक वलय प्राप्त झालंय. याचा फायदा भाजपला यावेळच्या प्रचारसभांसाठीही झाला. राजकीय जाणकारांकडून आणि काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांनी योग्य ठिकाणी प्रचारासाठी जाण्याचं सुतोवाच केल्याचं समजतंय.

देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती का?
देशातल्या राजकारणात आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता पक्षातूनही तितकीच ताकद मिळतेय. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. भाजपच्या केंद्रातल्या महत्त्वाच्या बैठका – निर्णयांमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस सहभागी असतात. म्हणून अलिकडेच त्यांच्या दिल्ली वाऱ्याही वाढल्याचं दिसून आलंय. मात्र, त्यांचा सगळा भर हा महाराष्ट्रावरच असून सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी महत्त्वाचे निर्णय तेच घेत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात नियमित होत असते. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारचे आधारस्तंभ असलेले फडणवीस केंद्रीय भाजपमध्येही महत्त्वाचे नेते म्हणून उदयाला येत आहेत.

Tags: 4 State electionBJPDevendra fadnvis
SendShareTweetSend
Previous Post

आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिनी भरगच्च कार्यक्रम ; सुरेश हसापुरे यांचे उत्कृष्ट नियोजन ; युवक अध्यक्ष गणेश डोंगरेंची साथ

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा ;  नियोजन बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांचे युवा मोर्चाचा कार्यकर्त्यांना हे आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा ;  नियोजन बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांचे युवा मोर्चाचा कार्यकर्त्यांना हे आवाहन

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002030
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group