आ. दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश ; अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण
अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्यात यावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप ,आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार नितीन पवार यांच्या समवेत सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी केली होती.
या मागणीला यश येऊन आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी एकमताने संमत करण्यात आली. याबद्दल भरणे यांनी आनंद व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो.