Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘शहर मध्य’मधून भाजपचे देवेंद्र कोठे उमेदवार? ; फेसबुक वरील ती पोस्ट ठरतेय चर्चेची

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 October 2024
in political
0
‘शहर मध्य’मधून भाजपचे देवेंद्र कोठे उमेदवार? ; फेसबुक वरील ती पोस्ट ठरतेय चर्चेची
0
SHARES
827
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘शहर मध्य’मधून भाजपचे देवेंद्र कोठे उमेदवार? ; फेसबुक वरील ती पोस्ट ठरतेय चर्चेची

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शहर मध्य या मतदारसंघासाठी सध्या शिवसेना की भाजप ही जागा कोणाला सुटणार यासाठी चुरस असल्याचे माहिती समोर आले आहे. जागा वाटपामध्ये ॲडजस्टमेंट करून शहर मध्य भाजप घेणार असल्याची ही चर्चा असून या शहर मध्य साठी भाजपकडून माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळणार असल्याचेही आता जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

भारतीय जनता पार्टीची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये विद्यमान तीन आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहर मध्य साठी मात्र एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने जोर लावला आहे. या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, जिल्हा प्रमुख मनीष काळजे, राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे हे इच्छुक आहेत. या तिघांपैकी काळजे आणि वाघमारे हे स्थानिक मध्य मधील रहिवासी असल्याने त्यांनी हा मतदारसंघ आपणाला सुटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे ठिय्या मांडल्याचे बोलले जात आहे.

हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटला तर शिवसेनेचे शहरात अस्तित्व राहणार नाही या भूमिकेत काळजे आणि वाघमारे आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्यावर शहर मध्यची जबाबदारी देण्यात आली होती ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडताना कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना मध्य मध्ये मताधिक्यापासून रोखण्यात यश मिळवले.

देवेंद्र कोठे हे तेव्हापासून शहर मध्यचे उमेदवार राहतील अशी चर्चा असून त्यासाठी त्यांनी मागील चार महिन्यात या मतदारसंघात महासेवा शिबिराच्या माध्यमातून आपली जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कोठे यांचे पालकत्व स्वीकारल्याने त्या शब्दाची उतराई फडणवीस हे कोठे यांना उमेदवारी देऊन करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे तसेच कोठे यांची उमेदवारी जवळजवळ फायनल झाली असल्याचे समजल्याने भारतीय जनता पार्टीतील माजी नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला काही दिवसांपूर्वी पत्र पाठवून विरोध केल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे.

Tags: BJPCity Central solapurCongressDevendra kothe
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण मध्ये भाजपला टेन्शन दिलीप माने यांचेच ; माने यांचेच नाव आघाडीवर

Next Post

सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर कार पलटी होऊन अपघात ; महिला डॉक्टर वाचल्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर कार पलटी होऊन अपघात ; महिला डॉक्टर वाचल्या

सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर कार पलटी होऊन अपघात ; महिला डॉक्टर वाचल्या

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979997
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group