Thursday, September 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

स्वावलंबी शेतकऱ्यांच्या सन्मानाने सोलापुरात कृषी दिन साजरा ; झेडपीत झाले वृक्षारोपण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 July 2024
in Agriculture
0
स्वावलंबी शेतकऱ्यांच्या सन्मानाने सोलापुरात कृषी दिन साजरा ; झेडपीत झाले वृक्षारोपण
0
SHARES
142
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वावलंबी शेतकऱ्यांच्या सन्मानाने सोलापुरात कृषी दिन साजरा ; झेडपीत झाले वृक्षारोपण

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने कृषी दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने बहुउद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अतिशय उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आला. जिल्ह्यात कमी कालावधीत विहीर पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे पूर्णत्वाचा दाखला वितरण, त्याचप्रमाणे या कीटकनाशक व फवारणी करताना घ्यावयाची काळजी याची अभिनंदन पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले, तूर लागवड व सोयाबीन लागवड या विषयावर डॉ. लालासाहेब तांबडे त्याचप्रमाणे जिवाणू खत व्यवस्थापन या विषयावर डॉ.डी व्ही.इंडी जीव शास्त्रज्ञ यांचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकरी पिक स्पर्धा यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा व महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कृषी विभाग जिल्हा परिषद व शासन स्तरावरील ज्यांनी उल्लेखनीय कामकाज केले असे अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे .त्याचप्रमाणे उत्पादित मालाला बाजारपेठ कसे उपलब्ध होईल आणि उत्पादन मालाला मिळणारे उत्पन्न हे नेहमी प्लस मध्ये असावे अशा पद्धतीचे नियोजन करावे .त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सेस योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केले.

शेतकरी बचत गटांना प्रात्यक्षिक किट वाटप करण्यात आले. प्रारंभी जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी प्रास्ताविक केले तर शितल चव्हाण, संचालक आत्मा व मदन मुकणे, संचालक स्मार्ट प्रकल्प, राजकुमार मोरे उपसंचालक यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कृषि अधिकारी सागर बारावकर, मोहिम अधिकारी अशोक मोरे, रामचंद्र माळी, अंबिका वाघमोडे, मिथुन भिसे, राजश्री कांगरे, महानंदा कुंभार, उमेश काटे, शंकर पाटील, सुरेश राठोड, मल्लिनाथ स्वामी, शंकर पाथरवट, लक्ष्मण वंजारी, हरूनपाशा नदाफ, श्रीकांत कोष्टी, ओमप्रकाश कोकणे, शंकर पाटील, रोहित शिंदे, राम कांबळे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: Krushi dayKrushi vibhagZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

आषाढी वारीत झेडपी ठेवणार 1 हजार स्नानगृहा सहित 4 हजार शौचालये ; स्वच्छतेचे अप टू डेट नियोजन

Next Post

संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी जोरदार मोर्चेबांधणी ; दक्षिणचा ‘मार्ग ‘ सापडला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी जोरदार मोर्चेबांधणी ; दक्षिणचा ‘मार्ग ‘ सापडला

संतोष पवार यांची महायुतीकडून उमेदवारी जोरदार मोर्चेबांधणी ; दक्षिणचा 'मार्ग ' सापडला

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999523
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group