सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माझी वसुंधरा अभियानासाठी सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे झोकून देऊन काम करत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक बैठक माझी वसुंधरा साठी हा उपक्रम राबवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला आहे. स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या 16 विभागाच्या विभाग प्रमुखांना तालुकानिहाय एक बैठक माझी वसुंधरा साठी या उपक्रमाला नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे माझी वसुंधरा अभियान हे सध्या चळवळ झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी एक बैठक माझी वसुंधरा यासाठी सर्व ग्रामपंचायती मध्ये उपक्रम राबविण्याचा आदेश काढण्यात आला होता परंतु अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा यांनी या आदेशाला सरळ-सरळ केराची टोपली दाखवत त्यांनी हा उपक्रम साजरा केला नाही..
उलट ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच किंवा इतर ग्रामपंचायत सदस्य यांना कुठला ही त्यांनी ना निरोप ना माहिती न देता त्याने या उपक्रमाला सरळ सरळ हरताळ फासला आहे..
दरम्यान सीईओ दिलीप स्वामी यांच्या एक बैठक माझी वसुंधरा या संकल्पनेला सरळ सरळ धुडकावून लावलेल्या ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजायांच्यावर काय कारवाई करणार याकडं लक्ष लागून राहिले आहे.

















