सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी शासकीय ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना देण्यात आली..
यानंतर उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सोलापूर जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यास जिल्हा परिषद प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता कोळी, कार्यकारी अभियंता मोरे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांच्यासह जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.