सोलापूर : बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष शुभेच्छा संदेश आला आहे. मनीष काळजे यांचा 11 नोव्हेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदरच शुभेच्छा संदेश पाठवून त्यांच्या वाढदिनाचा उत्साह आणखीच वाढवला आहे.
वाढदिवस म्हणजे एक नवी सुरुवात. आपल्या सर्व जिवलगांना एकमेकांशी घट्ट बांधणारा हा दिवस. आयुष्यातील आजवर मिळवलेले यश, क्षण आणि साथ याबद्दल कृतार्थता आणि खुणावणारे भविष्य अशा संमिश्र भावना या दिवशी मनात असतात. आपल्या कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेच्या बळावर समाजकार्य घडावे आणि राष्ट्र हितासाठी आपले भरीव योगदान लाभावे. आपली साथ माझ्यासाठी नेहमीच आश्वासक आहे. पुढील काळही असाच आनंद, यश आणि आकांक्षांच्या पूर्ततेचा असो, या मन:पूर्वक सदिच्छा.
|| जीवेत् शरदः शतम् ॥