Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर एमआयडीसी व्यावसायिकांच्या महापालिका व महावितरण बद्दल सर्वाधिक तक्रारी ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या महापालिका व महावितरणला या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 17 (जिमाका):-अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. उद्योगांना नियमित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. उपरोक्त दोन्ही एमआयडीसी मध्ये उद्योजकांचा प्रतिनिधी घेऊन वीज पुरवठा कोठे कोठे खंडित होतो, तसेच रोहित्र व्यवस्थित आहेत का?  याबाबत तपासणी करावी. व  पुढील काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता महावितरण ने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समिती च्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. परदेशी, महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण राजेश मदने, एमआयडीसीचे वसुंधरा जाधव, ए. डी. मगर, उद्योजकांचे प्रतिनिधी निलेश शहा, श्रीकांत अंबुरे, राम रेड्डी, रमेश डाकलिया, राजू राठी, रामेश्वरी गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील उद्योजकांचे वीज खंडित होणे, ट्रीप होणे रोहित्रवर अतिरिक्त भार असणे त्यामुळे मशिनरी खराब होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने अक्कलकोट एमआयडीसी उद्योजकांचा प्रतिनिधी सोबत घेऊन तपासणी करावी व सुरळीत वीज पुरवठा करावा. त्याचप्रमाणे एमआयडीसी चिंचोली मध्ये जी याच पद्धतीने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये रस्ते, स्ट्रीट लाईट पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था महापालिकेने देणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राष्ट्र औद्योगिक विकास संस्थेने ही कामे करावी यासाठी महापालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे, त्या अनुषंगाने एमआयडीसीला पत्र पाठवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांना दिले. तसेच महापालिकेने अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरासाठी जिल्हा नियोजन समिती मधून फायर स्टेशन साठी एक कोटी 25 लाखाचा प्रस्ताव सादर केलेला आहे, त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल. प्रमाणे फायर स्टेशन साठी आवश्यक असलेले वाहन खरेदीसाठी जवळपास एक ते दीड कोटीचा निधी आवश्यक असल्याने हा निधी विशेष बाब म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ यांनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात महापालिकेने वेळच्यावेळी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पाठवावी. त्याचप्रमाणे दोन्ही एमआयडीसी साठी सोलापूर शहरातून कामगारांना ये जा करण्यासाठी महापालिकेने सिटी बस सेवा उद्योजकाची चर्चा करून त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केल्या. या दोन्हीही एमआयडीसी साठी अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लईट व  ड्रेनेज सिस्टीम साठी कामे सुचवण्यासाठी सुचवणे व प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती गठीत करावी असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसी मधील अनेक उद्योजक बैठकीस उपस्थित होते त्यांनी त्यांचे उद्योग व एमआयडीसी परिसरातील विविध समस्येच्या अनुषंगाने आपली मते मांडली व त्या समस्या प्रशासनाने सोडवण्याची मागणी केली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या मागील इतिवृत्ताची माहिती दिली.तसेच या सभेच्या अनुषंगाने विविध विषयाची मांडणी केली. यावेळी त्यांनी राज्य शासनाने उद्योग भवन मंजूर केले असून रत्नागिरी नंतर सोलापूरला उद्योग भवन उभारण्यास मंजुरी दिल्याची माहिती दिली. तसेच शासनाने सुरू केलेले व नवउद्योगांच्या अडचणी दूर करणारे एक खिडकी या पद्धतीने कार्यरत असणारे मैत्री ॲप विषयी माहिती दिली.

SendShareTweetSend
Previous Post

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक ; झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा ‘ संजय आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल ; ताईंनी केले स्वागत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा ' संजय आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल ; ताईंनी केले स्वागत

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002315
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group