पैगंबर जयंती उत्सव कमिटी अध्यक्षपदी मतीन बागवान कार्याध्यक्ष शकील मौलवी तर जनरल सेक्रेटरी पदी अखलाक दिना (मेंबर) यांची एक मतांना निवड करण्यात आली.
सोलापूर येथील जशने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूरचे कार्यकारी मंडळाची सभा माजी महापौर तथा अध्यक्ष विश्वस्त समिती यांचे अध्यक्षतेखाली होऊन यावर्षीचे पैगंबर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पदी मतीन बागवान, कार्याध्यक्ष शकील मौलवी, जनरल सेक्रेटरी अकलाक दिना (मेंबर), उपाध्यक्ष जावेद खरेदी, जॉईन सेक्रेटरी पदी सोहेल कुरेशी तर इस्माईल मुन्ना शेख खजिनदारपदी एकमतांनी निवड करण्यात आली.
याच सभेट जुलूस प्रमुख राजू हुंडेकरी, राजू कुरेशी, सईद नायकवाडी, मुन्ना वळसंकर व कलीम तुळजापूरे तसेच सजावट प्रमुख उमर बागवान, समीर शेख, अशपाक बागवान तर मीडिया प्रमुख अयाज दिना (मेंबर) यांची निवड करण्यात आली. संस्थेच्यावतीने पैगंबर जयंती निमित्त विविध स्पर्धा आयोजित करून विजेतांना बक्षीस देण्याच्या निर्णय घेण्यात आला. या सभेत संस्थाचे विश्वस्त माजी महापौर यु एन बेरिया, विश्वस्त वाहिद नदाफ, विश्वस्त हनीफ बडेपीर, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, अल्लाबक्ष मणियार, सलीम सय्यद आदी उपस्थित होते.