सोलापूर : अभिनेता शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. चित्रपट मोठ्या प्रमाणावर गर्दी खेचत आहे, अभिनेत्री दीपिका पादुकोन यांच्या भगव्या बिकनी वरून चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या पार्श्वभूमीवर सोलापुरात ही हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने शुक्रवारी उमा चित्रमंदिर समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केला, यावेळी चित्रपट चालकांनी तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली असता फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले, पोलिसांचे पथक काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना झाले.