सोलापूर – येथे सागर सिमेंट लिमिटेडच्या वतीने गवंडी (मिस्त्री) बांधवांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मिस्त्री मेळावा म्हटलं की सिमेंट बद्दल माहिती देणं हा भाग तर आलाच, परंतु त्याच बरोबर त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध गोष्टीवर प्रबोधन करण्याच्या हेतूने सैफुल भागातील मिस्त्री बांधवांसाठी सागर सिमेंटचे डीलर लक्ष्मी स्टील ट्रेडिंग कंपनी यांच्या दुकानासमोरील प्राणांगणात ह्या मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते.
“कुठल्याही व्यवसाय वाढीसाठी प्रत्येक घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामधे सागर सिमेंट पोहचवण्यात आमच्या मिस्त्री बांधवांचा देखील मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे, अजून जास्तीत जास्त प्रमाणात सागर सिमेंटचा प्रसार व प्रबोधन होण्याच्या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मिस्त्री बांधवांच्या देखील काही सूचना आल्या. त्यावर देखिल नक्कीच विचार करू व पुढील काळात शहरातील इतर भागात देखील मिस्त्री मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे प्रतिपादन सागर सिमेंटचे महाराष्ट्र राज्य मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले.
या कार्यक्रमास सागर सिमेंटचे डीलर, रिटेलर, कंपनीचे अधिकारी व मिस्त्री बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.