Monday, May 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपला करावे लागले मग काँग्रेसचा कधी होणार ; आता तर काँग्रेसचे कार्यकर्तेही करू लागले मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 September 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राजकीय पक्ष आणि पदांसाठी इच्छुक दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याचाच विचार करून सर्वात प्रथम शिवसेनेने आपल्या जिल्हाप्रमुखांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. तीन तालुक्याला एक जिल्हाप्रमुख अशी नेमणूक प्रथम शिवसेनेने केली त्यामुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांना संधी मिळाली. त्यावरच भारतीय जनता पार्टीने सुद्धा रेघ ओडताना एवढ्या मोठ्या पक्षानेही अखेर निर्णय घेऊन टाकला. सोलापूर जिल्ह्यात त्यांचे आता दोन जिल्हाध्यक्ष आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर लोकसभा मतदारसंघांनुसार त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची नेमणूक केली आहे. तीच मागणी आता काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते करू लागले आहेत.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातील असून त्यांचा व्याप मोठा आहे, त्या भागात धवलसिंह मोहिते पाटील यांचे मोठं राजकीय जाळे आहे, कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.  त्यामुळे त्यांच्यावर  असलेली जबाबदारी पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी दोन जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाने करावेत अशी मागणी आता सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आता आमदार ताईंचे आपल्या लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू होत आहेत.  ग्रामीण भागामध्ये जाताना त्यांना निश्चितच आपल्या जिल्हाध्यक्षाची साथ मिळणे महत्त्वाचे आहे.  सोलापूर लोकसभेमध्ये त्यांनी विजय मिळवला तर निश्चितच शहर मध्य सोबत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि जवळ जवळ मोहोळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. मोहोळ तालुक्यातील एक बडा नेता काँग्रेसच्या संपर्कात असून त्यांनी काँग्रेस प्रवेश केला तर त्यांच्याही गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी जाण्याची चर्चा ऐकण्यास मिळते.

भारतीय जनता पार्टीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावरील वाढती जबाबदारी आणि व्याप पाहता दोन जिल्हाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. माढा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील अंतर्गत वाद शमवण्यासाठी पक्षाने सांगोल्याचे केदार यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालून सर्वांनाच गप्प केले, त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाने धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर माढा लोकसभेची जबाबदारी देऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नवा जिल्हाध्यक्ष नेमावा अशा मागणीने आता जोर धरला असून काँग्रेस पक्षाकडून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील रहीमबाबा अन्सारींचा ६३ वा ऊर्स; दोन दिवस कव्वाली मैफल

Next Post

“माय माऊल्या आम्हाला माफ करणार नाहीत” ; राम सातपुतेंचा आक्रोश ‘जलजीवन ‘ वर DPC सभागृह तापले ! Video

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"माय माऊल्या आम्हाला माफ करणार नाहीत" ; राम सातपुतेंचा आक्रोश 'जलजीवन ' वर DPC सभागृह तापले ! Video

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979819
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group