सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या वतीने आकस्मित निधन झालेल्या सदस्यांच्या परिवारास विमा योजना अंतर्गत दोन लाख प्रत्येकी अशा तीन सदस्यांना सहा लाख रुपयांचे निधीचे वितरण पुणे विभागीय उपायुक्त विजय मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुळीक यांनी पतसंस्थेच्या एकुण कारभाराविषयी माहिती घेतली. कमी व्याजदरात कर्ज, पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन, तातडीच्या कर्जाची अर्ध्यातासात उपलब्धता, सभासदांसाठी कॅशलेस मेडीक्लेम, त्याचप्रमाणे पतसंस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची स्तुती केली. सभासदांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांची काळजी करणारी ही सोलापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण पुणे विभागातच नव्हे तर राज्यात एकमेव पतसंस्था असल्याचे मत यावेळी मुळीक यांनी व्यक्त केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, चेअरमन विवेक लिंगराज, व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.पी.माने यांनी केले तर प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, अनिल जगताप, विष्णु पाटील, दीपक घाडगे, हरीबा सपताळे, धन्यकुमार राठोड,दत्तात्रय घोडके, शाहजान तांबोळी, सुंदर नागटिळक, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, त्रिमुर्ती राऊत, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, सचिव दत्तात्रय देशपांडे, माजी संचालक आर.एम, काझी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी अशोक पवार, सुभाष काळे, विनोद कदम, नितीन येमुल यांनी परिश्रम घेतले.