सोलापूर : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुडले यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किरकोळ हुल्लडबाजी वगळता अतिशय उत्साह आणि जल्लोषात कार्यक्रम सुपरहिट ठरला.
पंधरा ते वीस हजार युवकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. विशेष करून महिला व युवतींची मोठी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांच्या हस्ते गौतमी पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मेंडगुडले यांचा वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील यांनी सत्कार केला.
सुमारे शंभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 8 वाजून 20 मिनिटांनी गौतमी पाटील यांची स्टेजवर एन्ट्री झाली, “सरकार तुम्ही करताय, मार्केट जाम” या गाण्यावर भन्नाट नृत्य केले.
त्यानंतर त्याचे अतिशय लोकप्रिय असलेले “पावण जेवळत का” या गीतावर त्यांनी नृत्य करताच सर्वांनी जल्लोष केला, त्याचवेळी महिलांमध्ये एक छोटा बालक नाचत होता त्याला लगेच गौतमी पाटील यांनी आपल्या स्टेजवर बोलावून घेतले आणि त्या मुलासोबत नृत्य केले, तो क्षण पाहण्यासारखा होता…
त्या चिमुकल्या मुलाचे नाव होते, विराट उमाकांत फडतरे तो मंद्रुप इथल्या झेडपी प्राथमिक शाळेत इयत्ता 2 री मध्ये शिकतो आहे. नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. गौतमीचा जिथे कार्यक्रम तिथे राडा होणारच. परंतु मंद्रूप या ठिकाणी किरकोळ प्रकारची हुल्लडबाजी झाली परंतु कोणताही गोंधळ झाला नाही, पोलिसांनी वेळेवरच सर्व नियंत्रणात आणल्याचे पाहायला मिळाले.