एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,सोलापूर येथे 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांचे हस्ते दक्षिण सोलापूर तालुका तहसिल कार्यालयाचे आवारात ध्वजारोहण करण्यात आले, तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन व तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.
प्रकल्प कार्यालय सोलापूरच्या वतीने प्रकल्प अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन आरंभ’ अंतर्गत आदिवासी पारधी समाजातील बंधू भगिनींना आणि विद्यार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र मिळवून देण्याबाबत दिलेला शब्द गेल्या वर्षी व याही वर्षी ‘मिशन पूर्तीच्या’ रूपाने आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत जात प्रमाणपत्र वाटप करून पूर्ण करून दाखविला. पारधी समाजाला जातप्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणार्या अडचणींचा विचार करून तहसील कार्यालय अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोलापूर यांच्या एकत्रित समन्वयाने जातप्रमाणपत्रांसाठी विशेष मोहीम सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांनी राबविली होती.
कार्यक्रमास दक्षिण सोलापूर तहसीलदार अमोल कुंभार, प्रकल्प कार्यालय सोलापूरचे दोन्ही सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोकडे व शेळके इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीत अधीक्षक व्ही.वाय.सरतापे यांनी केले.