सोलापूर : सोलापुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना भारतीय जनता पक्षाने थेट प्रदेश वर काम करण्याची मोठी संधी दिली आहे त्यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले. यावेळी पक्षाचे यतीराज होनमाने, अक्षय अंजीखाने यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरेश पाटील हे धनगर समाजाचे नेते आहेत. समाजाच्या चळवळीत ते कायम सक्रिय दिसून आले आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला. सोलापुरात कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी माझ्या आजपर्यंत च्या भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे केलेल्या कामाप्रति विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टी OBC मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली असून, भाजप OBC मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते साहेबांनी काल या नियुक्तीचे पत्र मला पाठविले माननीय बावनकुळे साहेब, माननीय गाते साहेबांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी नक्कीच येणाऱ्या काळात संघटन वाढीसाठी प्रयत्न करून या पदास न्याय देईन व आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास सुरेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.