मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे उजनी कॅनॉल फुटल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
उजनी धरणाचा डावा कालवा फुटून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील खरात वस्तीजवळ हा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी दिसून येत होते. कालव्याचे पाणी थेट शेतात गेल्यामुळे परिसरातील ऊस द्राक्ष तसेच इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर परिसरात असलेल्या विहिरींमध्ये देखील गाळ भरला गेला असल्याने विहिरींचे देखील मोठे नुकसान झाले आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे अद्याप पर्यंत समजले नाही.
शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या ऊस द्राक्ष तसेच डाळिंब पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी या भागाची पाहणी करून उपाययोजना सुचवल्या आहेत.