सोलापूर : पुलावरून पडून हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला. नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हरणांचा कळप पुलावरून खाली पडला आहे.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. जवळपास 12 हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान ‘या भागातून नेहमीच हरणं आणि इतर प्राणी रोड क्रॉस करत असतात. घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने हरणाच्या कळपाने पुलावरून उडी मारली असेल आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाला असेल’ असा अंदाज सोलापूर वन विभागाचे प्रमुख, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी वर्तवला आहे.