सोलापूर : ॲड.मनोज गुंडे व ॲड.शिवाजी कांबळे यांच्या अथक प्रयत्न व योग्य समुपदेशन यामुळे तीन चिमुकल्या मुली वडिलांच्या प्रेमा पासून वंचित न राहता त्यांच्या छत्र छायेत परतले.
यातील हकीकत अशी की अर्जदार महिलेचा विवाह हा गुलबर्गा येथे ५ मे २०१५ रोजी झाला होता. काही वर्षे सुखाने संसार केल्यानंतर पती-पत्नी मध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद निर्माण झाले. परिणामी पती-पत्नी हे मागील दोन वर्षांपासून विभक्त झाले. या वादाचा परिणाम हा महिलेच्या तीन मुलींना झाला. त्यांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च, पालन पोषणाचा खर्च वाढत होता, अशा अनेक कारणामुळे अर्जदार महिलेला त्रास होऊ लागल्याने अर्जदार महिलेने कौटूंबिक हिंसाचार कायदा २००६ अन्वये सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील यांच्या न्यायालयामध्ये पती विरुद्ध दावा दाखल केला.
तिचे पती आळंद येथे नगरपरिषदेमध्ये कार्यरत आहेत. परंतू मे.कोर्टाकडे अर्जदारांचे विधीज्ञ ॲड.शिवाजी कांबळे व ॲड.मनोज गुंडे यांनी सततचा पाठपुरावा केला.तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून यातील पती व पत्नी यांना समजावून सांगितले की तुम्हांला तीन मुली आहेत त्यांचे शिक्षण, आरोग्य, त्याचे भविष्यामध्ये होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. या अथक प्रयत्नामुळे पती- पत्नीने दोघे एकत्र राहण्याचे मान्य केले, तदनंतर ही सर्व घटना सोलापूर विधी सेवा प्राधिकरणाचे मे. न्यायाधीश जोशी यांना सांगितले नंतर यातील पती व पत्नी यांना समजावून सांगितले की तुम्हांला तीन मुली आहेत त्यांचे भविष्यामध्ये होणारे परिणाम याबाबत समुपदेशन केले. पती-पत्नीने एकमेकांचे नाते संवर्धित करण्यासाठी एकमेकांना सहाय करावे, जेणेकरून उभयंतांचे वैवाहिक जीवन सुखकर होईल. एकमेकांच्या कुटुंबा विषयी आदर निर्माण होईल, याबाबत मार्गदर्शनदेखील केले. त्यानंतर पती- पत्नीने दोघे एकत्र राहण्याचे मान्य केले.
अशा प्रकारे विधी सेवा प्राधिकरणाचे में न्यायाधीश श्री जोशी, अर्जदाराचे विधीज्ञ ॲड.शिवाजी कांबळे व ॲड.मनोज गुंडे , ॲड. निदा सैपन ,तसेच सामनेवालाचे विधीज्ञ हर्षवर्धन शिंदे यांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात आले व तीन लहान चिमुकल्या बालकांना वडिलांच्या प्रेमा पासून वंचित न राहता त्यांच्या छत्र छायेत परतले. अशाप्रकारे हे कुटुंब पुन्हा एकत्रित सुखी समाधानी राहावे यासाठी वरील सर्वांनी यशस्वी प्रयत्न केले.