महा आवाज अभियान पुरस्कार 2021-22 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी ग्रामपंचायतने 98.8 गुण मिळवून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘सर्वांसाठी घरे- २०२४’ या शासनाच्या धोरणांतर्गत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना. आदिम आवास योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे यासाठी १६ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयान्वये २० नोव्हेंबर २०२१ ते ३० जून २०२२ दरम्यान महाआवास अभियान २०२१-२२ राबविण्यात आले. या कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणान्या संस्था व व्यक्ती यांना पुरस्कार देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निम्बर्गी ग्रामपंचायतीने बाजी मारली आहे.
दक्षिणचे सुरेश हसापुरे यांच्या पावलावर पाऊल टाकत एका वर्षात चांगली कामगिरी करून दाखविले. सरपंच श्रीदिप हसापुरे व या कामी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जोडमोटे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, उप मुख्य कार्यकारी इशाधीन शेळकंदे व मुख्य कारकारी अधिकारी मनीषा आव्हाळे याचे ही अभिनंदन होत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पारितोषिक मिळाले आहे. अशाच प्रकारे पूर्वी सुरेश हसापुरे यांना जिल्हा परिषदमधे चांगल्या पध्दतीने काम केल्यावर आदर्श सदस्य म्हणून पारितोषिक मिळाले होते. त्यांचाच आदर्श घेऊन त्यांचे चिरंजीव सरपंच श्रीदीप हसापुरे हे कामकाज करत असल्याचे दिसून येते.