सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली सोलापुर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे आयोजित सोलापुर शहर युवक काँग्रेसचे माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांची स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांची विविध फ्रंटल सेल व नुतन पदाधिकार्यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार ही यावेळी संपन्न झाला. काँग्रेस भवन सोलापूर येथे कार्यक्रम झाला.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासने दिली पण एकही पूर्ण करू शकले नाही. उलट महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल गैस सिलेंडरचे दर प्रचंड वाढले, महिला अत्याचार, कोरोना काळातील अपयश विडी यंत्रमाग कामगरांचे हाल, यामुळे सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाले आहे. पाच राज्यातील सर्व्हे मध्ये काँग्रेस पुढे आहे. २०१९ ची निवडणूक मोदींनी पुलवामा घडवून जवानांचे रक्त सांडून निवडणूक जिंकली. हिंदू मुस्लिम करत येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा पुन्हा असेच काहीतरी कांड करतील. म्हणून युवकांनी मोदी सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे जनजागृती केली पाहिजे. नवीन मतदार नोंदणी करणे, बूथ यंत्रणा मजबुत करणे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासुन जनतेचे काय काय नुकसान झाले हे जनतेला पटवून देण्यासाठी युवकांवर फार मोट्ठी जबाबदारी आहे.
यावेळी प्रवक्ते प्रा.अशोक निबंर्गी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, प्रदेश सचिव पंडित सातपुते, प्रदेश युवक सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे, यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.