Tuesday, June 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एका दक्षिण तहसील कार्यालयात तब्बल इतके हजार कुणबी पुरावे शोधले ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची अचानक भेट ; पुढे काय घडले…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 November 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.10(जिमाका):- राज्य शासनाने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात युद्धपातळीवर मोहीम सुरू केलेली आहे, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत. 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन मराठा कुणबी पुरावे मदत कक्षास भेट देऊन  कक्षाच्या वतीने तपासणी करत असलेल्या अभिलेखाची पाहणी करत आहेत. दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री साडेआठ वाजता जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील कक्षास भेट दिली असता तेथील अभिलेख शोध मोहिमेची माहिती घेतली. दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षातील वीस सदस्यांनी सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत एकाच दिवसात 46 हजार 500 जुनी अभिलेखे तपासणी केली. या अभिलेखात मराठी भाषा व मोडी लिपी भाषेतून मराठा कुणबी नोंदणी आढळून येत आहेत. दक्षिण तहसील कार्यालयाने एकाच दिवसात 46 हजार पेक्षा जास्त महसुली अभिलेखाची तपासणी केल्याबद्दल  जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त करून दक्षिण तहसीलदार व त्यांच्या टीमचे कौतुक केले.

दक्षिण तहसील कार्यालयाने महसूल विभागाचे रेकॉर्ड, जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर, क, ड, ई पत्रक, सर्व्हे नंबर उतारे या अभिलेखाची तपासणी केली. यामध्ये मराठी तसेच मोडी लिपी मध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख तपासणी पथकाला मराठा कुणबी नोंदी अभिलेखात कशा पद्धतीने तपासव्यात तसेच मोडी लिपीत मराठा कुणबी शब्द कशा पद्धतीने आहे याबाबत माहिती दिली. दक्षिण तहसील कार्यालयात नोंदी तपासणीचे काम चांगले सुरू असून जिल्ह्यात सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोंदीमध्ये मराठा कुणबी जातीच्या नोंदीचा अधिक गतीने व सूक्ष्मपणे शोध  घ्यावा. तसेच नागरिकांनीही त्यांच्याकडे मराठा कुणबी नोंदी असलेली जुने अभिलेखे असतील तर त्याबाबत मदत कक्षास माहिती द्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले.

यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, दक्षिण तहसीलचे तहसीलदार किरण जमदाडे, निवासी नायब तशिलदार राजाभाऊ भंडारे, नोडल अधिकारी नायब तहसीलदार  दत्ता गायकवाड, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव व महसूल चे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

                   *********

SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापूर तालुक्याच्या निम्बर्गी गावाची राज्यात बाजी ; का होतंय सरपंच श्रीदीप हसापुरे यांचे जिल्ह्यात कौतुक

Next Post

‘वंचित’ नेते प्रकाश आंबेडकरांचा मंद्रूप ग्रामपंचायतने का केला अभिनंदनाचा ठराव ; वाचा हि बातमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'वंचित' नेते प्रकाश आंबेडकरांचा मंद्रूप ग्रामपंचायतने का केला अभिनंदनाचा ठराव ; वाचा हि बातमी

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981493
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group