सोलापूर : गेल्या आठवड्यात जडवाहतुकीमुळे 3 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याने सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये मोठा आक्रोश होता व ही शहरात येणारी जडवाहतुक बंद करावी याकरिता सर्वपक्षीय युवकांनी एकत्र येऊन,कृती समितो स्थापन केली होती.
आज जडवाहतूक समितीच्या सदस्यांनी आमदार सुभाष बापूंची भेट घेऊन, जडवाहतुकीमुळे सोलापूर शहरात सुरू असलेला मृत्यूचा तांडव थांबविण्यासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात व पोलीस आयुक्तांना आपण सूचना कराव्यात अशी मागणी केली असता,तात्काळ आमदार सुभाष बापू देशमुख यांनी कृती समितीच्या सदस्यांसमोर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना कॉल केला व जडवाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असून,यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून,आपण या शहरात येणाऱ्या जडवाहतुकीच्या वेळेत बदल करावा व प्रशासनातील काही अधिकारी जड वाहतूक,सोडतात अशा आरोप नागरिक करत असून,अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना दिल्या.
जडवाहतुकीमुळे नागरिकांचे जीव जाऊ नये,याकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याबाबत बोलतो असे याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी बैठकीत सांगितले.
सदर बैठकीस सामाजिक कार्यकर्ते राज सलगर, DPI चे युवक प्रदेशाध्यक्ष सोहन लोंढे, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, अमित पाटील, राम जाधव, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, राहुल दहिहंडे, कृती समीतीचे पदाधिकारी उपस्थित होते.