सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची एका दांडिया कार्यक्रमात भेट झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा अतिशय आदर सन्मान केला. निमित्त होते काँग्रेस नेते सुरेश हसापुरे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दांडीया स्पर्धेचे.
विजापूर रोड भागातील मांगल्य मंगल कार्यालय येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांचे आगमन झाले. खरटमल हे स्टेजवर बसले होते त्यानंतर दहा मिनिटांनी आमदार प्रणिती शिंदे या त्याठिकाणी आल्या. स्टेजवर आमदार शिंदे येताच सन्मानाने नमस्कार घातला. तितकाच सन्मान आमदार ताईंनीही खरटमल यांचा केला. संयोजक जेव्हा शिंदे यांचा सत्कार करत होते तेव्हा त्यांनी खरटमल यांच्याकडे हात करून यांचा सत्कार करा असे सांगितले.
सत्कार स्वीकारून प्रणिती शिंदे या बाहेर पडल्या, तिथे ही खरटमल हे थांबून होते, अरे तुम्ही गेला नाहीत अजून असे शिंदे म्हणाल्या, नाही माझी गाडी तिकडे आहे असे म्हणतात तुम्ही जा मी जाते असे म्हणून त्या गाडीत बसल्या. त्यानंतर त्यांनी “तुम्ही ज्येष्ठ नेते आहात” असे शिंदे म्हणताच खरटमल यांनी हसापुरे यांच्याकडे हात करून ‘ही इज सीनियर’ म्हणाले परंतु प्रणिती ताईंनी “तुम्हीच सर्वाधिक सीनियर आहात” असे म्हणताच एकच अशा पिकला.
सुधीर खरटमल हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खरटमल यांना सोलापूर लोकसभेसाठी शब्द दिला असल्याचे खरटमल सांगताहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी घोषित केले आहे. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसची असल्याने आणि खरटमल हे सुद्धा इच्छुक असल्याने सोलापूरची जागा मिळवण्यात कोण बाजी मारणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून तूर्त चर्चा तर होणारच.