सोलापूर : महात्मा फुले यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र अशी निदर्शने करण्यात आली. प्रदेश महासचिव अप्पासाहेब लोकरे, माजी शहराध्यक्ष देवा उघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आले.
लोकरे यांनी भिडे यांचा निषेध नोंदवत त्यांना राज्य सरकारने तातडीने अटक करावी अन्यथा बहुजन समाज पार्टी आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.
देवा उघडे यांनी मात्र भाजपचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील यांना लक्ष केले. ज्या महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे त्यांच्या पत्नी दोन वेळा नगरसेविका झाल्या त्यांनी भिडे यांचे समर्थन करण्यापेक्षा जाणीव ठेवावी या शब्दात निषेध नोंदवला..