सोलापूर : शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकोलेकाटी या शाळेचा एसएससी बोर्ड मार्च 2023 चा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक- कुमारी स्मरणिका ब्रह्मदेव मोटे 93%. गुण मिळवून प्रथम व द्वितीय क्रमांक-कुंभार श्रुतिका संतोष 91.20% गुण मिळवून द्वितीय, जांभळे धनश्री संजय-88.60%. गुण मिळवून तृतीय आली व प्रशालेत चौथा क्रमांक क्रमांक मस्के प्रेरणा चंद्रकांत-84.60% गुण मिळून चौथा क्रमांक पटकावला.
विशेषत: पहिले चार क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम बर्डे यांनी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांक आलेले विद्यार्थीनी यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले तसेच प्राचार्य शंकर वडने यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



















